छत्रपती संभाजीनगर ग्रामीण दामिनी पथकाने तत्पर कारवाई करत खुलताबाद पोलिस ठाणे हद्दीतील देवळाना येथे होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला.गोपनीय माहितीनुसार सपोनि सरला गाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन चौकशी केली असता मुलीचे वय १६ वर्षे ९ महिने असल्याचे निष्पन्न झाले.दामिनी पथक व चाइल्डलाईन समुपदेशक सचिन दौड यांनी पालक व नातेवाईकांचे सखोल समुपदेशन केले.बालविवाहाचे गंभीर सामाजिक, शैक्षणिक व आरोग्यविषयक दुष्परिणाम तसेच कायदेशीर शिक्षांची माहिती देण्यात आली.