गोंदिया शहर हद्दीत प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा गोंदिया पोलीसांनी कारवाई केली आहे.पोलीस अधिक्षक गोंदिया गोरख भामरे यांचे निर्देशाप्रमाणे,पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर,स्थानिक गुन्हे शाखा, शगोंदिया यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा,गोंदिया येथील पोलीस पथक जिल्हा हद्दीत अवैधधंदावर रेड कारवाई कामी पेट्रोलिंग करीत असताना गोपनिय माहीती की,मरगट रोडवरील संत श्री आसारामजी गुरुकुल समोर एक इसम शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करीत आहे.