भंडारा: काँग्रेस पुड्या फेकते, 208 मतांचा नेता मिरवतो! – आमदार फुके यांची आमदार पटोले यांच्यावर तीक्ष्ण टीका
आमदार फुके म्हणाले की, “निवडणुका आल्या की काँग्रेस पुड्या फेकण्याचं काम करत राहते आणि लोकांची दिशाभूल करते. मागील विधानसभा निवडणुकीत काही आपल्या लोकांच्या गद्दारीमुळे अविनाश ब्राह्मणकर फक्त 208 मतांनी पराभूत झाले. आणि त्या 208 मतांनी निवडून आलेले नाना पटोले आज साकोलीत छाती ठोकून फिरत आहेत.” ते पुढे म्हणाले, “मी या भागात 25-30 वर्षे राजकारण करतोय. लोकांच्या मागासलेपणाचा आणि अफवांचा गैरफायदा घेत काँग्रेस सतत दिशाभूल करते.