शहरातील श्रीराम कॉलनी येथे महिला शिक्षिकेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.मृत शिक्षिकेचे नाव वैशाली राजेंद्र तायडे-शेलार (वय ४५) असे आहे.वैशाली व त्यांचे पती राजेंद्र तायडे हे मेहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.घटनेच्या वेळी पती रजेवर गावाकडे गेले असताना वैशाली घरी एकट्याच होत्या.आत्महत्येपूर्वी त्यांनी मुलाच्या खात्यावर ७० हजार रुपये पाठवले, त्यामुळे संशय निर्माण झाला.घरी दरवाजा आतून बंद असल्याने नातेवाइकांनी तोडून आत प्रवेश केला.