मराठी वृत्तपत्रसृष्टीतील अग्रगण्य नाव असलेल्या 'लोकमत' वृत्तपत्राच्या नागपूर आवृत्तीने दिमाखदार ५४ व्या वर्षात पदार्पण केले आहे. या सुवर्णमयी वाटचालीनिमित्त गोंदिया येथील लोकमत कार्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून लोकमत परिवारावर शुभेच्छांचा वर्षाव केला. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून सर्वांना शुभेच्छा दिल्या.