हिंगणघाट पोलीसांनी गोल बाजार परीसरातील व्हिडिओ गेम पार्लरवर कारवाई करीत २ लाख ५५ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार पोलिसांना गोल बाजार परीसरातील व्हिडिओ गेम पार्लर सुरू असून याठिकाणी पैशाची हारजीत होत असल्याची माहिती मिळताच पोलीसांनी याठिकाणी जाऊन रेड केला असता याठिकाणी व्हिडिओ गेम पार्लर व अन्य मशीन आढळून आल्या यावेळी पोलीसांनी ६ जणांवर गुन्हा दाखल करून २ लाख ५५ हजार २४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.