यवतमाळ: कुणबी मराठा समाजासाठी वधु वर परिचय वेबसाईटचा शुभारंभ,समाज बांधवांनी लाभ घेण्याचे दिनेश हरणे पाटील यांचे आव्हान
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या अकराव्या वंशज ह.भ.प. श्री. प्रशांत महाराज मोरे (देहूकर), देहू, पुणे यांच्या मंगल आशीर्वादाने कुणबी / मराठा समाजासाठी ‘www.kunbijeevansathi.in’ या अत्याधुनिक वधू-वर परिचय वेबसाईटचा शुभारंभ करण्यात आला. ही वेबसाईट देश व राज्यातील समाज बांधवांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह व तंत्रज्ञानसंपन्न व्यासपीठ आहे. युवक-युवतींसाठी योग्य नातेसंबंध घडविणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.पालकांसाठी ही वेबसाईट विश्वास व निश्चिंतत....