पातुर: संविधान दिनानिमित्त भव्य रांगोळीचं अनावरण; पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
Patur, Akola | Nov 27, 2025 संविधान दिनानिमित्त अकोला जिल्हा कलाध्यापक संघ आणि आनंद बुद्ध विहार, सस्ती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान अर्पण करतानाचे भव्य रांगोळीचे दर्शन घडवण्यात आले. तब्बल १० बाय १५ फूट आकाराची आणि १२० किलो रंगीत रांगोळीपासून साकारलेली ही कलाकृती तयार करण्यास ८ तासांचा अवधी लागला. रांगोळीच्या भव्य आणि सूक्ष्म कलात्मकतेमुळे परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.