शिरूर कासार: फुलसांगवी मार्कवाडी शिवारात बिबट्याने एक घोडा आणि शेळीचा फडशा पाडला, घटनास्थळी वन विभाग टीम दाखल
शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी ता. शिरूर कासार गावाच्या शिवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या मेंढपाळांच्या छावणीवर मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला चढवून एका घोड्याचा आणि एका मेंढीचा फडशा पाडला आहे. या घटनेमुळे फुलसांगवी परिसरात मोठी दहशत निर्माण झाली असून, शेतकऱ्यांनी बिबट्याच्या बंदोबस्ताची तातडीने मागणी केली आहे. तालुक्यातील फुलसांगवी परिसरात सध्या रब्बी हंगामाची कामे मोठ्या जोमाने सुरू आहे.