औसा: कन्हेरी येथे शॉर्टसर्किटमुळे आग ; ट्रॅक्टरसह २० लाखांचे नुकसान
Ausa, Latur | Mar 8, 2024 औसा तालुक्यातील कन्हेरी येथील एका शेतातील विद्युत डीपीजवळ शॉर्टसर्किट होऊन अचानक आग लागल्याने त्यात ट्रॅक्टरसह जवळपास २० लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा महसूल विभागाने केला आहे. औसा तालुक्यातील कन्हेरी येथील पुरुषोत्तम पांडुरंग झिरमिरे यांच्या शेतीत विद्युत डीपी आहे. या डीपीपासून जवळपास ५० ते ६० फूट अंतरावरील एल.टी.लाइनच्या विद्युत खांबावर अचानक आग लागली. त्यामुळे डीपीमध्ये मोठा आवाज होऊन ठिणग्या पडल्या.