मुरबाड: गावातील चिखलावर उपाययोजना न केल्याने निर्भय महाराष्ट्र पार्टीचे तालुकाध्यक्ष अहिरेंचे मुरबाड येथे चिखलात बसून उपोषण सुरू
Murbad, Thane | Jan 2, 2025 आज दिनांक 2 जानेवारी रोजी सकाळी 11 वा निर्भय महाराष्ट्र पार्टीचे मुरबाड तालुका अध्यक्ष सागर अहिरे यांनी मुरबाड येथे चिखलात बसून उपोषण सुरू केलं आहे. सागर अहिरे यांनी सांगितले की त्यांच्या गावांमध्ये चिखल जमा होत आहे. या संदर्भात त्यांनी ग्रामसेवकांना आणि सरपंचांना निवेदन देऊनही कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे आज पासून ते त्याच चिखलात बसून उपोषण करत आहेत.