उदंड वडगाव शेती वाद मारहाण प्रकरणातील पीडित कुटुंबावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, कडक कारवाईची पीडित कुटुंबाची मागणी
Beed, Beed | Nov 19, 2025 बीड तालुक्यातील उदंड वडगाव येथे शेतीच्या वादातून चार जणांना भावकीतीलच लोकांकडुन भीषण मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. याचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय या व्हिडिओमध्ये लोखंडी पाईप, लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या दिसत आहेत. या मारहाणीत चार जण गंभीर जखमी असून बीड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तरी आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबीयांनी माध्यमांसमोर बोलताना केली आहे.