वर्धा जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक निकालांवर राज्याचे राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.जिल्ह्यातील एकूण सहा नगरपरिषदांपैकी तीन जागांवर भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. जिल्हयातील सर्व सहा नगरपरिषदांमध्ये भाजपचे सुमारे 70% उमेदवार निवडून आले.या निकालावरून वर्धा जिल्ह्यातील जनतेचा कल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने असल्याचे स्पष्ट झाले आहे. असे आज 21 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता प्रसिद्धस दिले