भंडारा: शहापूर परिसरात किरकोळ वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
भंडारा तालुक्यातील शहापूर येथे दि. १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:१५ वाजता दरम्यान किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. फिर्यादी कार्तिक प्यारेलाल मडामे (वय ३७, रा. शहापूर) हे त्यांच्या खाजगी चारचाकी वाहनाने बाहेरगावी जात असताना, त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर आरोपी दीपक इस्तारी नान्हे (वय ३०) याने आपला मिनी ट्रक (MH-40/AK 2178) उभा ठेवला होता. यामुळे रस्ता अडल्याने फिर्यादीने गाडीतून उतरून आरोपीला ट्रक बाजूला करण्यास सांगितले. यावर आरोपीने "मी गाडी.