निफाड: खेडलेझुंगे येथे मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची सभा संपन्न
Niphad, Nashik | Aug 3, 2025 मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेला लढा आता निर्णायक टप्प्यावर आला असून, यावेळी कुणीही अडथळा आणण्याचा प्रयत्न केला,तर समाज त्यांना वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही’, असा ठाम इशारा मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील यांनी दिला.खेडलेझुंगे (ता. निफाड) येथे ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी ८ वाजता पार पडलेल्या भव्य महामेळाव्यात ते बोलत होते. यावेळी परिसरातील निफाड, येवला आणि सिन्नर तालुक्यातून हजारो मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.