चाळीसगाव नगरपरिषदेतील भारतीय जनता पक्षाच्या गटाची अधिकृत नोंदणी आज जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री.रोहन घुगे यांच्याकडे करण्यात आली. चाळीसगाव नगरपरिषदेत पक्षाच्या संघटनात्मक कार्याला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने ही गट नोंदणी प्रक्रिया करण्यात आली. यासोबतच चाळीसगाव नगरपरिषदेचे नगरसेवक श्री.प्रशांत कुमावत यांची भारतीय जनता पक्षाच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सदर गट नोंदणीसाठी आवश्यक असलेला प्रस्ताव व कागदपत्रे मा. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी श्री.रोहन घुगे यांच्याकड