देवळी नगरपालिका अध्यक्ष पदाकरिता अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी अनपेक्षित विजय मिळवत नगराध्यक्षपदावर आपले नाव कोरले आहे.या निवडणुकीत किरण ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ. शोभा तडस यांचा पराभव केला आहे. ही लढत अत्यंत चुरशीची मानली जात होती, मात्र देवळीच्या मतदारांनी अपक्ष उमेदवाराला कौल दिल्याचे स्पष्ट झाले आहे.आज 21 डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकानुसार या विजयावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.