भंडारा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ च्या मतमोजणी दरम्यान ईव्हीएम मशिनमध्ये गंभीर तांत्रिक त्रुटी आणि फेरफार झाल्याचा आरोप उमेदवार प्रतिनिधींनी केला आहे. टेबल क्रमांक १ वरील मशिनमध्ये केवळ चारच उमेदवारांची मते आणि नावे दर्शवली जात होती, तर प्रत्यक्षात रिंगणात असलेल्या ५ आणि ६ क्रमांकाच्या उमेदवारांची नावे मशिनमधून पूर्णपणे गायब असल्याचे निदर्शनास आले. मतदानाच्या दिवशी वापरण्यात आलेली मूळ बॅलेट मशिन तपासासाठी मागवली असता, त्यावरूनही उमेदवारांची नावे गहाळ असल्याचे समोर आले.