देवळाली प्रवरा नगरपरिषदेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी विकासाचा स्पष्ट अजेंडा जाहीर केला आहे. देवळालीत सर्वप्रथम सुशासन आणण्यावर भर देणार असून गावकऱ्यांनी दाखवलेला विश्वास पूर्णपणे सार्थ ठरवू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. देवळाली प्रवरा सुरक्षित शहर बनवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील, असे सांगत त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे संकेत दिले.आज रविवारी दुपारी ते माध्यमांशी बोलत होते.