नगर–मनमाड महामार्गाच्या सुरू असलेल्या कामासाठी ये-जा करणारे डंपर चिंचविहिरे मार्गाने मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक करत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या ओव्हरलोड डंपरमधून मुरमाचे दगड सातत्याने रस्त्यावर पडत असून, यामुळे यापूर्वीही अनेक प्रवासी व ग्रामस्थ जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. आज सकाळीही ओव्हरलोड डंपरमधून उडालेला दगड एका ग्रामस्थांच्या अंगावर लागून तो किरकोळ जखमी झाला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.