नागपूर कडून वर्धेकडे दुचाकीने जाणाऱ्या युवकांचा वाहन अनियंत्रित होऊन भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना ता. १६ डिसेंबर मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास मौजा केळझर शिवारात वर्धा नागपूर महामार्गावर नर्सरी जवळ घडली. रोशन बाहेकर वय 24 व आदित्य पवार वय 22 दोघेही रा. यवतमाळ अशी जखमींची नावे आहेत. दोन्ही जखमींना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.