आर्णी शहरातील हाफिज बेग नगरात काल दिनांक 10 डिसेंबरला रात्री घडलेली घटना थरकाप उडवणारी होती. शांत, निवांत परिसरात रात्री 12 वाजताच्या सुमारास अचानक बिबट्या दिसल्याने नागरिक अक्षरशः भेदरून गेले. जेवणानंतर रोजप्रमाणे फिरण्यासाठी संदीप किसन रावते,वसीम सैय्यद इस्माईल, इरफान शेख रा. मुबारक नगर आर्णी हे घराबाहेर पडलेले हाफिज बेग नगरात असलेल्या पांदन रस्त्यावर पोहोचताच अचानक अंधारातून एक बिबट्या त्यांच्या समोर उभा राहिला. क्षणभर सगळे थिजून गेले. त्याचवेळी त्या बिबट्याने संदीप रावते या युवकाव