सेलू: शहरातील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये ३२ वर्षीय व्यक्तीची गळफास लावून आत्महत्या, सेलू पोलिसांत मर्ग दाखल
Seloo, Wardha | Dec 5, 2024 दारूच्या आहारी गेलेल्या इसमाने घरीच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना ता. 4 बुधवारी दुपारी 1 वाजताच्या सुमारास शहरातील वॉर्ड क्रमांक 4 मध्ये उघडकीस आली. गणेश तुकाराम माहुरे वय 32 रा. वॉर्ड क्रमांक 4 सेलू असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी मृतकाचा भाऊ गजानन तुकाराम माहुरे वय 34 यांचे फिर्यादीवरून दुपारी 2.15 वाजता सेलू पोलिसांत मर्ग दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांकडून ता. 5 गुरुवारला मिळाली.