आष्टी पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे आष्टी पोलिसांनी मौजे डोंगरगाव शेत शिवारात दिनांक 27 तारखेला पाच वाजताच्या दरम्यान छापा घातला असता 26 लोखंडी पिप्यामध्ये 390 लिटर कच्चा मोह फुल सडवा रसायन आढळून आला इतर साहित्य आणि मोहा फुल सडवा रसायन असा एकूण जुमला किंमत 39 हजार 520 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला . पोलीस स्टेशन आष्टी यांनी अपराध क्रमांक 04 28 ऑब्लिक 2025 कलम 65 एफ महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल केले असल्याचे आज सांगितले