नगरपरिषदांमध्ये देखील महायुतीची सत्ता येणार ही कळ्या दगडावरची भगवी रेघ आहे, एवढे लोक जर रस्त्या उतरली, एवढ्या सर्व लोकांनी सकाळी उठून मतदान केलं तर मला वाटतं विरोधकांचा डब्बा गुल झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. नेवासा येथे शनिवारी सायंकाळी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचाराच्या सांगतात प्रसंगी ते बोलत होते.