उमरखेड: सोईट शिवरतून अवैध दारू साठा जप्त : बिटरगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
बिटरगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या सोईट शेत शिवारात रात्री पोलिसांनी अवैध देशी दारू साठा जप्त करत मोठी कारवाई केली आहे. २४/११/२०२५ सोमवार रोजी रात्री ११/०० वा पांडुरंग शिंदे ठाणेदार सा.पो.स्टे. बिटरगाव यांना गोपणीय खबर मिळाली कि ब्राम्हणगाव येथील इसम नामे विपीन माधवराव कोथळकर (३५)वर्षे हा त्याच्या सोईट शेत शिवारातील शेतात अवैध्यरित्या ३५ बॉक्स देशी दारू विकी करण्याच्या उददेशाने बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई केली.