समुद्रपूर: तालुक्यातील भोसा ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायत अभियानाची आढावा सभा पार पडली. याप्रसंगी गटविकास अधिकारी पंचायत समिती समुद्रपूर सतीश टिचकुले यांच्या उपस्थितीत विभाग निहाय आढावा घेण्यात आला.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी व विस्तार अधिकारी तथा नोडल अधिकारी (मु.मंत्री स.प.अ),मा.श्री.नरेशजी वानकर (प्रशासक ग्रा.पं. भोसा ) श्री.एन.एस.डेहनकर ,पंचायत समिती समुद्रपूर येथील तालुका आरोग्य अधिकारी व विस्तार अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.