माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथेजिल्ह्यातून एक धक्कदायक आणि दुर्दैवी घटना समोर आली आहे. एका तरुणाने राहत्या घरात गळफास घेत आपले जीवन संपवल्याचे समोर आले आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केला जात आहे. या तरुणाचे केवळ ६ महिन्यापूर्वी लग्न झाले होते. ही घटना टाकरवण येथील आहे. मात्र तरुणाने हे टोकाचे पाऊल का उचलले? हे स्पष्ट झालेलं नाही आहे.कृष्णा नंदकिशोर लड्डा (वय 27) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. गावात आठवडी बाजार असल्यामुळे त्याचे वडील खताच्या दुकानात गेले होते.