इंदापूर शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शकील सय्यद यांनी पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने त्यांची भारतीय जनता पक्षातून व शहराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती इंदापूर तालुका भाजपा अध्यक्ष ॲड. शरद जामदार यांनी मंगळवारी १६ एप्रिल रोजी भाजपा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे.