पवनी तालुक्यातील आसगाव येथील रमेश ब्राह्मणकर वय 60 वर्षे व गोविंदा कोरे वय 50 वर्षे हे एकाच गावचे असून त्यांच्यात शेतीच्या धुऱ्याच्या कारणावरून वाद आहे. दरम्यान दिनांक 4 जुलै रोजी सकाळी 9 वाजता दरम्यान आसगाव शेतशिवारात रमेश ब्राह्मणकर हा त्याच्या शेतात धानाचा रोवना सुरू असताना तो शेतातील धुऱ्याचा कचरा साफ करीत असताना आरोपी गोविंदा हा त्या ठिकाणी आला आणि तू धुरा कशाला फासतो असे बोलून भांडण केले. भांडणाचे रूपांतर मारहाणीत झाले. यात आरोपी गोविंदा याने बासाच्या काठीने रमेश याला मारहाण केली