यवतमाळ येथील महात्मा फुले चौक येथे असलेल्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यावर दि.२१ एप्रिल रोजी अज्ञात समाजकंटकाने शाई फेकून विटंबना केल्याबाबत अखिल भारतीय समता परिषदेच्या वतीने बुधवारी २४ एप्रिल रोजी निषेध नोंदवत इंदापूर तहसिलदार यांना कठोर कारवाईसाठी लेखी निवेदन देण्यात आले आहे.