भोर: शिवरे गावात राजगड पोलिसांची मोठी कारवाई; ६१ लाख २७ हजार ८४० रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Bhor, Pune | Sep 23, 2025 भोर तालुक्यातील शिवरे गावच्या हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या ट्रकवर राजगड पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ६१ लाख २७ हजार ८४० रुपयांचा अवैध गुटखा जप्त केला आहे.तसेच ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे.