जालना: दिनांक १४/१२/२५ दरवर्षी 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येतो. सिकल सेल या आजाराबाबत माहिती देण्यात येते. सिकल म्हणजे विळा होय. या आजारामध्ये रक्तपेशी विळ्याच्या आकारासारख्या होतात. हा रक्तदोष आजार आहे. रक्त तपासणी द्वारे या रोगाचे निदान होते. दोन रंगीत कार्ड धारकांनी विवाह करू नये. कारण सिकलसेल हा अनुवंशिक आजार आहे. नियमित तपासणी औषध उपचार घेतल्यास हा आजार नियंत्रित ठेवता येतो. रक्ताची तपासणी करू या सिकलसेल टाळू या!