आज दिनांक 18 जानेवारी 2026 वार रविवार रोजी दुपारी 4वाजता भोकरदन क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भेट देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकांना अभिवादन करत पुष्कर अर्पण केले आहे, यानंतर त्यांनी उपस्थित समाज बांधवांशी संवाद साधला आहे ,यावेळी एक मराठा लाख मराठाच्या जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी परिसरातील शेकडो मराठा समाज बांधव उपस्थित झाले होते.