आमदार किशोरआप्पा पाटील यांच्या प्रयत्नांतून नगरदेवळा स्टेशन परिसरात सुमारे अडीचशे एकर क्षेत्रावर एमआयडीसी मंजुर झाली आहे. तेथील जागा आरक्षित करून तेथे उद्योग उभारणीसाठी प्लाॅटींगचे काम पुर्ण झाले आहे. तर आता उद्योग उभारण्यासाठी येथे उद्योगासाठी आवश्यक मुलभूत सुविधा असणे आवश्यक आहे. या अंतर्गत कामांच्या अनुशंगाने राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 10 डिसेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजता नागपुर येथे अधिकाऱ्याची बैठक आयोजित करण्यात आली आहे,