समुद्रपूर: मोहगांव ग्रामपंचायत कार्यालयात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा स्वयंसेविका अर्चनाताई औरके यांच्या हस्ते ध्वजारोहण
समुद्रपुर:तालुक्यातील मोहगांव येथे हर घर तिरंगा, हर घर स्वतंत्रता उत्सव, स्वतंत्रता के संग विशेष अभियानांतर्गत १३ ऑगस्टला ग्रामपंचायत कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पहिल्यांदाच दिवसी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच नवघरे यांनी ध्वजारोहणाचा मान गावात आरोग्यासह विविध शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सहकार्य करणाऱ्या आशा स्वयंसेविका अर्चनाताई औरके यांना दिला.यावेळी त्यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.