15 डिसेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार बेलतरोडी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनीष नगर येथे छापा मार कार्यवाही करून हॉस्पिटल जवळ घातक क्षेत्र घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. अटकेतील आरोपीचे नाव आदित्य लहांगंडाले असे असून त्याच्याकडून दोनशे रुपये किमतीचा चाकू जप्त करण्यात आला आहे. आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे