राहुरी रेल्वे स्थानक परिसरातील रेल्वे लाईनवर शनिवारी सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली. तांदूळवाडी येथील दत्तात्रय अंबादास चव्हाण (वय ४६) यांचा रेल्वेखाली येऊन जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार,चव्हाण हे रेल्वे लाईनवरून चालत असताना मोबाईल फोनवर बोलत होते. त्याचवेळी दोन्ही बाजूंनी रेल्वेगाड्या येत असल्याने त्यांचा अंदाज चुकला. एका बाजूने येणाऱ्या रेल्वेगाडीने त्यांना जोरदार धडक दिली.धडकेमुळे त्यांच्या शरीराचे गंभीर तुकडे त्यांचा मृत्यू झाला.