धुळे: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे सुप्रीम कोर्टाकडून संकेत; धुळे कोर्ट रोड परिसरातून ॲड. राहुल वाघ यांची माहिती
Dhule, Dhule | Nov 28, 2025 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निकालाच्या अधीन राहून निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत. धुळे कोर्ट रोडवर माध्यमांशी बोलताना मुख्य याचिकाकर्ते अॅड. राहुल वाघ यांनी ही माहिती दिली. 50% आरक्षणावरील कोंडी फुटल्याचे सांगत त्यांनी प्रकरण तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे वर्ग झाल्याचे सांगितले. पुढील सुनावणी 21 जानेवारीला होणार असून निवडणूक प्रक्रिया न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहणार आहे.