केंद्रीय क्रीडा स्पर्धा व शालेय क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन गुरु. दि.अठरा डिसेंबरला उच. प्रा. शाळा पटगोवारी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. उत्कृष्ट नियोजन,शिस्तबद्ध अंमलबजावणी करीत हा महोत्सव थाटामाटात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ग्रा.पं. च्या उपसरपंच सौ कविता निमरड होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर माकडे, उपाध्यक्ष देवका टेकाम, गजेंद्र मोदेकर दामिनी, रितू ठाकरे, नरेश कोठेकर, कैलास आडमाची ग्रामसेवक प्रामुख्याने उपस्थित होत.