हिंगणघाट नगरपरिषदेच्या वतीने दिलेल्या नोटीसच्या अनुषंगाने डॉ बि.आर आंबेडकर शिक्षण संस्था सचिव अनिल जवादे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. संबंधित जागेवर गेल्या ६० वर्षांपासून शैक्षणिक संस्था कार्यरत असून आजही शिक्षणदानाचे कार्य सुरू आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र त्या जागेवर अतिक्रमणधारक असल्याचा दावा करत, त्यांच्याकडून दिलेल्या निवेदनावर तीन दिवसांत उत्तर द्या, असे पत्र नगरपालिकेकडून देण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.