शहापूर: पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदतीच्या मागणीसाठी ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर ठाकरे गटाचे आंदोलन
राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी या मागणीसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 च्या सुमारास ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर जोरदार आंदोलन केले. अतिवृष्टीमुळे पिकांचे आणि शेतजमिनीचे झालेले मोठे नुकसान लक्षात घेऊन, ठाकरे गटाने राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे पाऊल उचलले. या आंदोलनात ठाकरे गटाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. शेतकऱ्यांना त्वरित मदत करा आणि ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.