समाजकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून जालना जिल्ह्यातील शासकीय निवासी शाळा व शासकीय वसतिगृहांसाठी आयोजित दोन दिवसीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा जल्लोषात संपन्न झाल्या. शनिवार दि. 3 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार क्रीडा स्पर्धा अंकुशराव टोपे महाविद्यालय, जालना येथे तर सांस्कृतिक कला महोत्सव श्री. मुक्तेश्वर सांस्कृतिक सभागृह, जालना येथे पार पडला. दरम्यान समाजकल्याण विभागातील अधिकारी व कर्मचार्यांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.