पाचोरा: घरफोडी करणारा जेरबंद, 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल 4 तासातच जप्त, पाचोरा पोलीस स्टेशनची उत्तम कामगिरी,
भातखंडे खुः ता.पाचोरा येथे घरफोडी करणारा आरोपी जेरबंद करुन 41,500/-रु किमतीचा मुददेमाल अवघ्या 04 तासात जप्त केल्याची उत्तम कामगिरी पाचोरा पोलीस स्टेशन यांनी केली आहे, दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सोपान भिकन कुमावत वय 51 वर्ष रा.भातखंडे खुः पाचोरा हे लग्नानिमीत्त बाहेरगावी गेले असल्याने त्यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी आर्थिक फायदयासाठी घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन 41,500/- रु किमतीची रोख रक्कम चोरी केलेबाबत पाचोरा पोलीस स्टेशन सोपान कुमावत यांचे फिर्यादीवरून गुन्हा दाखल,