राहुरी: नगर–मनमाड महामार्गावर डिग्रस फाटा परिसरात भीषण अपघात,अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
नगर–मनमाड महामार्गावरील अपघाताचे सत्र सुरूच असुन आज पुन्हा एका एकेरी वाहतुकीमुळे एका निष्पाप तरुणाचा बळी गेला असुन या रस्त्यावर प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक ठरत आहे आज रविवार, २८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे साडे बारा वाजण्याच्या सुमारास डिग्रस फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सहकारी जखमी झाला आहे.नदीम आदम शेख वय १९ असे मृत तरुणाचे नाव आहे.