फिर्यादी अरुण विठ्ठलराव भिसे यांच्या तक्रारीनुसार 5 जानेवारीला फिर्यादी हे गौण खनिज पथक गस्तीवर असताना आरोपी चालक भीमराव कोवे व वाहन मालक रवी पांडे यांच्या ताब्यात असलेले विना क्रमांक चे ट्रॅक्टर ट्रॉली वाहन थांबविण्यात आले.वाहनाची झडती घेतली असता वाहनात एक ब्रास रेती तसेच टोपले व फावडे असे साहित्य मिळून आले.यावेळी विचारपूस केली असता आरोपींनी रेती खाली करून आल्याचे सांगितल्याने त्यांना रेती वाहतूक करण्याबाबत परवाना विचारला व ट्रॅक्टर तहसील कार्यालय घाटंजी येथे लावण्यात सांगितले असता...