रत्नागिरी: सेवा पर्व २०२५ च्या अनुषंगाने भाट्ये समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम संपन्न
सेवा पर्व २०२५ अंतर्गत जिल्हा प्रशासन महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभाग, नगर परिषद, ग्रामपंचायत भाट्ये, फिनोलेक्स, गद्रे मरीन, पटवर्धन हायस्कूल, रा बा शिर्के प्रशाला स्काऊट विद्यार्थी, आदींच्या संयुक्त विद्यमाने भाट्ये समुद्रकिनाऱ्याची आज स्वच्छता करण्यात आली. प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवून पर्यावरणाला हातभार लावा असे आव्हान जिल्हाधिकारी एम.देवेंदर.सिंह यांनी केले.