जमीन व्यवहाराच्या वादातून झालेल्या भांडणात चौघांनी युवकाला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना कटंगी येथील मयूर लॉन परिसरात घडली. फिर्यादी सेवकराम राणे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी यांनी ओम लाॅन मागील जमीन विक्री व्यवहाराच्या कारणातून सेवकराम सोबत वाद घातला. यावेळी आरोपींनी अश्लील शिवीगाळ करून सेवकराम यांना नाकावर बुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.