रत्नागिरी: रत्नागिरी एमआयडीसीतील वेश्याव्यवसाय प्रकरणी प्लॉट मालकाला अटक
रत्नागिरी एमआयडीसी येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी संशयित नेपाली महिला गेल्या चार महिन्यापासून वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. या महिलेला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर प्लॉट मालक सुनील कुमार गणपत प्रभू यांना शुक्रवारी सायंकाळी अटक करण्यात आली आहे.