यवतमाळ: न.प.,न. पं. सार्वत्रिक निवडणूक
मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ; जिल्हाधिकारी
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे नगरपंचायत ढाणकी येथील सोमवार, दि. 1 डिसेंबर रोजी भरविण्यात येणारा आठवडी बाजार, तसेच आचारसंहिता क्षेत्रात मंगळवार दि. 2 डिसेंबर रोजी भरविण्यात येणारे आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश पारित करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी विकास मीना यांनी याबाबतचा आदेश निर्गमित केला आहे.